वाहतुकीचे हे नियम माहिती असतील तर भरावा लागणार नाही दंड


1 सप्टेंबरपासुन वाहतुकीचे नियम बदलण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठा दंड आकारण्यात येत आहे. अशावेळेस छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला देखील दंड भरावा लागतो. मात्र तुम्हाला जर वाहतुकीचे हे नियम माहित असतील तर तुम्ही दंड भरण्यापासून वाचू शकता. जाणून घेऊया हे नियम.

  • जर कोणत्याही वाहनांचे कागदपत्रे नाहीत म्हणून तुम्हाला पकडले, तर ट्रॅफिक पोलिस तत्काळ तुमचे चलान काटू शकत नाही. मात्र पोलिस यावेळी गाडी जप्त करू शकते. आणि नियमांनुसार चालकाला गाडीची कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला जातो.
  • जर वाहनचालक 15 दिवसात गाडीची कागदपत्रे सादर करण्याचा दावा करत असेल, तर अशावेळेस पोलिस दंड करू शकत नाही. यानंतर 15 दिवसाच्या आत चालकाला कागदपत्रे पोलिसांना दाखवावी लागतील.
  • जर तुमच्या गाडीचे चलान कटले असेल, तर याचा अर्थ तुम्हाला दंड भरावाच लागेल असे नाही. तुम्ही सर्वाच्च न्यायालयात याबाबत आव्हान देऊ शकता.
  • जर न्यायालयाला वाटले की, चालकाकडे सर्व कागदपत्रे आहेत व त्याला ती सादर करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला नाही तर न्यायालयाकडून दंड माफ केला जातो.
  • जर तुम्ही रॅश ड्रायव्हिंग अथवा अन्य कोणत्या कारणासाठी पकडले गेला असेल तर तुम्हाला त्वरित दंड भरावा लागतो.

जर तुम्हाला देखील दंडापासून वाचायचे असेल तर या गोष्टी निश्चित लक्षात ठेवा –

  • जर तुम्ही दुचाकी चालवत असाल, तर आयएसआय मार्क असणारे हेल्मेट परिधान करा व मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट परिधान करण्यास सांगा.
  • चारचाकी गाडी चालवत असाल तर विना सीट बेल्ट गाडी चालवू नका.
  • दारू पिऊन गाडी चालवू नका.
  • तुम्ही कोणतेही वाहन विना इंश्योरेंस चालवू शकत नाही.
  • विना ड्रायव्हिंग लायसेंसची गाडी चालवू नका.
  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी कोणतेही वाहन चालवू नये.
  • ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरू नये.
  • दुचाकीवर दोन पेक्षा अधिक व्यक्तींना बसवू नये. असे केल्यास 3 महिन्यांसाठी तुमचे लायसेंस निलंबित होऊ शकते.
  • गाडीची कागदपत्रे नेहमी बरोबर ठेवा. याशिवाय कागदपत्रांची डिजिटल कॉपी देखील डिजी लॉकर अपमध्ये ठेऊ शकता.

Leave a Comment