यामुळे चेर्नोबिल अणुभट्टी अपघात क्षेत्र पाहण्याठी पर्यटकांची गर्दी


चेर्नोबिल या प्रसिध्द टिव्ही सिरीजनंतर चेर्नोबिल या ठिकाणी अणुभट्टीत झालेले अपघात क्षेत्राकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र हे पर्यटक  घडलेल्या घटनेविषयी जाणून घेण्याऐवजी सेल्फी काढण्यास अधिक उत्सुक असल्याचे समोर आले आहे.

येतील प्लँटचे गाइड असणारे येव्जेन गोनचारेंको म्हणाले की, लोकांना या घटनेविषयी माहिती जाणून घेण्यात काहीही रस नाही. त्यांना केवळ आता सेल्फी काढायचे आहे.

एचबीओच्या चेर्नोबिल या सिरीजनंतर या क्षेत्रात पर्यटकांची वाढ झाली आहे. एप्रिल 1986 मध्ये युक्रेनमधील चेर्नोबिल या शहराबाहेर असलेल्या अणुभट्टीत झालेल्या दुर्घटनेवर ही सिरीज आधारित आहे. या सिरीजला एम्मी अवार्डमध्ये 19 नॉमिनेशन मिळालेले आहेत.

सिरीजच्या आधी देखील हा भाग डार्क टुरिझम म्हणून प्रसिध्द होता. युक्रेनच्या काही ट्रॅव्हल एजिन्सनी स्पेशल ट्रिपचे आयोजन करत या भागात पर्यटकांना नेण्यास सुरूवात केली.  युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देखील हे क्षेत्र पर्यटनासाठी तयार करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

दरवर्षी या भागाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील वर्षी 72 हजार पर्यटकांनी येथे भेट दिली होती. हा आकडा वाढून 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र येथे येणारे पर्यटक हे घटनेची माहिती जाणून घेण्याऐवजी फोटो काढण्यास अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

 

Leave a Comment