या अब्जाधीशाने शाळेचे रुपांतर राजमहालात करत केले पुर्ण लहानपणीचे स्वप्न


शाळेत असताना आपली शाळा एखाद्या राजमहालाप्रमाणे असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. रशियाचे अब्जाधीश आंद्रेई सिमानोव्स्की यांनी हेच स्वप्न साकार करत त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेचा कायापालट केला आहे. त्यांनी शाळेला चक्क राजमहालामध्येच बदलले आहे. आंद्रेई सिमानोव्स्की हे एक उद्योगपती असून, त्यांनी येकातेरिनबर्ग 106 सेंकडरी शाळेचा कायापालट केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटिझन्सनी त्यांचे कौतूक केले.

आंद्रेई यांना लहानपणापासूनच श्रीमंत बनवायचे होते. अखेर त्यांनी शाळेला राजमहालाचे स्वरूप देत, त्यांचे स्वप्न पुर्ण केले. शाळेच्या छतावर लावलेले सोन्याचे झुंबर पाहुन असे वाटते की, एखाद्या फ्रांसच्या पॅलेसमध्येच आलो आहोत.

शाळेचे बहुतांश काम पुर्ण झाले आहे. वर्ग आणि ऑफिस देखील बदलण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर खेळाचे मैदान आणि जिम देखील बदलणार असल्याचे आंद्रेई यांनी सांगितले.

शाळेला अशाप्रकारे महालाचे स्वरूप दिल्याने अनेक डिजाइनर्स आणि ब्लॉगर्स त्यांच्यावर टिका करत आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यांना विरोध करण्यात आलेला नाही. येकातेरिनबर्गचे महापौर अलेक्जेंडर वायसोकिंस्की यांनी आंद्रेई यांचे समर्थन करत म्हटले की, हे सर्व ते समाजासाठी करत आहेत. चांगली गोष्ट करणाऱ्यांवर सर्वच टिका करत असतात.

शाळेच्या अधिकाऱ्यांनी देखील आंद्रेई यांचे समर्थन केले आहे. आंद्रेई म्हणाले की, जर शाळा महालांप्रमाणे असेल तर मुलांना आनंद होईल, त्यांना अधिक चांगले वाटेल. याआधी रशियातील द कॅसल ऑफ चाइल्डहुड किंडरगार्डन शाळेत देखील अशाच प्रकारे बदल करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment