पोलीस अधिकारी दंड करेल म्हणून अधिकाऱ्यावरच चढवली रिक्षा


रांची – सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत सुरु झालेल्या कारवाईचीच सध्या चर्चा सुरु आहे. देशभरात 23 हजार ते 59 हजार रुपयांपर्यंतचे वाहनचालकांचे चलन कापले जात आहे. झारखंडमध्येही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. वाहनचालकांची संपूर्ण कागदपत्रे असताना पोलिसांचा डोळा चुकवण्याच्या नादात असेही काही अपघातांचे बळी ठरत आहेत.

गुरुवारी, रांची मेन रोडवर वाहनाची कागदपत्रे तपासात असताना एका वाहनचालकाने चुटिया पोलिस स्टेशनचे वाहतूक स्टेशन अधिकारी जॉन मुर्मू यांच्यावर रिक्षा चढवली. या अपघातात मुर्म यांच्या पाठीचे हाड मोडले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक एसपी, कोतवाली डीएसपी आणि हिंदपीढी पोलिस अधिकारीही जखमी एसएचओ मुर्मू यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की एसएचओ जॉन मुर्मू रांची मेन रोडवरील ओव्हरब्रिजजवळ वाहनांची तपासणी करत होते. यावेळी, वेगाने येणाऱ्या गाडीला पोलिसांनी तपासासाठी थांबण्याचे संकेत दिले. दरम्यान, दंडाच्या भीतीने ड्रायव्हर पळून गेला आणि समोरून उभे असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली.

घटनेनंतर आरोपी चालक रिक्षासह फरार झाला. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment