चमत्कार! वयाच्या 74 व्या वर्षी दिला मुलाला जन्म


गुंटूर: आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात एका 74 वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला. यासह, ही महिला सर्वात जास्त वयातच मुलाला जन्म देणारी पहिली महिला बनली आहे. हे सहसा शक्य नाही की एखाद्या स्त्रीने एवढ्या जास्त वयात मुलाला जन्म दिला असेल. आंध्र प्रदेशचे हे प्रकरण वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहे आणि लोक त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. गुंटूर येथील ज्या दवाखान्यात हा सर्व प्रकार घडला तेथील डॉक्टरांनी याबाबतीच माहिती दिली आहे.

मंगायम्मा नावाच्या या महिलेने आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. अहल्या नर्सिंग होममध्ये तिची प्रसूती झाली. चार डॉक्टरांच्या टीमने महिलेची प्रसुती केली. डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्व करणारे एस. उमाशंकर यांनी सांगितले की आई व मूल दोघेही निरोगी आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी सांगितले की हा एक वैद्यकीय चमत्कार आहे.

मंगायम्मा जगातील सर्वात पहिली महिला बनली जी सर्वात वयोवृद्ध आई बनली. यापूर्वी 70 वर्षीय दलजिंदर कौरने हा विक्रम केला होता. कौरने 2016 मध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मुलाला जन्म दिला. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी मंगायम्मा लग्नानंतर 54 वर्षे आई होऊ शकली नव्हती. तिचा नवरा वाई राजाने आयव्हीएफ तज्ञांशी बोलले आणि नर्सिंग होमची मदत घेतल्यानंतर त्यांनी या दोघांची मदत केली.

मंगायम्मा नंतर म्हणाल्या की, मला खूप आनंद झाला आहे. देवाने आमची प्रार्थना ऐकली. नव्याने पालक बनलेल्या या दांपत्याने रुग्णालयात मिठाई वाटून मुलाचा आनंद साजरा केला. उमाशंकर म्हणाले की, डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांना आढळले की ती गरोदर होण्यास काही अडचण नाही.

आईव्हीएफ प्रक्रियेद्वारे मंगायम्मा गर्भवती झाली. यासाठी आरोग्य तपासणीसाठी तीन डॉक्टरांची टीम कार्यरत होती. नऊ महिने त्यांची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत होती. सतत तपासणी केल्यावर असे आढळले की त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.

गेल्या महिन्यात, या जोडप्याला गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात डोहाळे जेवण साजरे करायचे होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना एक महिना थांबायला सांगितले. प्रसूतीच्या काही तासांपूर्वी डॉक्टरांनी त्यांच्यासाठी हा उत्सव हॉस्पिटलच्या आवारात आयोजित केला होता, ज्यात रूग्णालयातील कर्मचारी आणि नातेवाईकांनी या जोडप्याचे अभिनंदन केले. डॉक्टरांनी सांगितले की आई व मुलाला काही दिवसांपासून डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली ठेवले गेले आहे.

Leave a Comment