एलजीने लाँच केला ड्युअल डिस्पलेवाला फोन


एकीकडे सॅमसंग  फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असताना आता. एलजीने देखील एक हटके स्मार्टफोन बर्लिनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने एलजी G8X ThinQ हा डिटॅचेबल सेकंडरी डिस्पले असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे.

एलजी G8X ThinQ या स्मार्टफोनमधील डिस्पले हे टाइप सी युएसबीने जोडलेले असतील. सेंकडरी डिस्पलेची साइज ही प्रायमेरी डिस्पले एवढीच असेल. याचा डिस्पले 6.4 इंच फुल एचडी+ आहे. याचबरोबर डिस्प्ले 360 डिग्री देखील फिरवता येणार आहे.

यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, ड्युअल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. 12 मेगा पिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल वाइड एँगल लेन्स रेअर कॅमेरा देण्यात आलेला आहे.

याचबरोबर क्वॉलकम स्नॅपड्रँगन 855 प्रोसेसर, अँड्राइड 9 पाय देखील देण्यात आला आहे. याशिवाय 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देखील आहे. बॅटरीविषयी सांगायचे तर यामध्ये 4,000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.

हा फोन बाजारामध्ये कधी उपलब्ध होईल व याची किंमत काय असेल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

 

Leave a Comment