अधिकृतरित्या लाँच झाली जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा


नवी दिल्ली – गुरुवारी अधिकृत रित्या रिलायन्स जिओची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च झाली. जिओने या सेवेंतर्गत मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. ग्राहकांना या प्लॅन्सनुसार 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.

६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांच्या रेंजमध्ये जिओच्या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे उपलब्ध आहेत. ग्राहकांना सुरुवातीच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तर यापुढच्या प्लॅन्ससाठी हा स्पीड १ जीबीपीएसपर्यंत मिळू शकणार आहे. ६९९ रुपयांच्या बेसिक प्लॅननंतर गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे १२९९ रुपये आहे. त्यावरील डायमंड प्लॅनचे मासिक भाडे २४९९ रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे ३९९९ रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे ८९९९ रुपये आहे. ग्राहकाला या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.

असे आहेत जिओ गीगाफायबरचे प्लॅन
६९९ रुपयांचा जिओचा हा बेसिक ब्रॉन्झ प्लॅन असून यामध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (१०० जीबी+ ५० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. त्याचबरोबर यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये युजर्सना भारतातील कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल.

ग्राहकांना ८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबीपीएस पर्यंत स्पीड मिळेल. तर अनलिमिटेड डेटा (२०० जीबी + २०० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. युजर्सना यामध्येही मोफत व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल.

१२९९ रुपयांच्या जिओच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकाला २५० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड (५०० जीबी + २५० जीबी एक्स्ट्रा) डेटा मिळेल. मोफत व्हॉईस कॉलिंगही मिळेल तसेच यात 4K स्मार्ट टीव्ही मोफत ग्राहकाला मिळेल.

ग्राहकाला २४९९ रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ५०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (१२५० जीबी + २५० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. यातही मोफत व्हॉईस कॉलिंग मिळेल. तसेच यामध्ये ग्राहकाला २४ इंची एचडी टीव्ही मिळेल.

Leave a Comment