जिओनीने लाँच केला केवळ 7,999 रूपयांचा शानदार स्मार्टफोन


स्मार्टफोन कंपनी जिओनी दिर्घ काळानंतर भारतीय बाजारात पुनरागमन केले असून, कंपनीने जिओनीने एफ9+ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. जवळपास 7 महिन्यानंतर कंपनीने भारतात स्मार्टफोन लाँच केला आहे. जिओनी एफ 9 प्लस फोनची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरमध्ये होईल. या फोनला दोन रंगाच्या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.

यामध्ये 6.26 इंचचा डिसप्ले आहे, ज्यात वॉटरडॉप नॉच मिळेल. याचबरोबर फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असून, कंपनीने प्रोसेसरचे नाव सांगितलेले नाही. यामध्ये 3 जीबी रॅम मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असून, ज्यात एक 13 मेगापिक्सल आणि दुसरा 2 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर फ्रंटला 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4050 एमएएचची बॅटरी मिळेल. याचबरोबर कनेक्टिविटीमध्ये 4 जी वीओएलटीई, 3.5 एमएमचा हेडफोन जॅक, वाय-फाय ब्लुटूथ मिळेल. या फोनची किंमत 7,999 रूपये आहे.