कारचालकाकडून हेल्मेट नाही घातले म्हणून दंडवसूली ? जाणून घ्या सत्य


गाडी चालवताना हेल्मेट परिधान करण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र कार चालवताना हेल्मेट परिधान करण्याचा कोणताही नियम नाही. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या कारचे चलान त्याने कार चालवताना हेल्मेट नव्हते घातले म्हणून कापण्यात आले आहे.

दंड केल्याने व्यापारी देखील हैराण झाला. या घटनेवर ट्रॅफिक एसपी चलान करत असताना चुकीचे बटन दाबले गेले असेल असे म्हणत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्यापारी अनीश नरूलाने ही गोष्ट सांगितल्यार एसपी देखील आश्चर्यचकित झाले. हे चलान अनीश यांच्याकडे पोहचल्यावर त्यांना या घटनेची माहिती समजली. कार चालवताना हेल्मेट परिधान न केल्याने पोलिसांनी त्यांना 500 रूपये दंड केला.

आता व्यापारी अनीश अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत विचारत आहेत की, कार चालवताना हेल्मेट घालावे लागेल का अनीश यांनी सांगितले की, त्यांच्याकडे क्रेटा कार आहे. मात्र त्यांच्या कारच्या नंबरवर स्कुटीचे चलान करण्यात आले आहे.

अशाप्रकारे चलान कापल्याने अनीश यांनी एसपी कडे तक्रार दिली. एसपी सुभाष चंद्र म्हणाले की, तांत्रिक अडचणीमुळे असे होण्याची शक्यता असून,  या गोष्टीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment