व्हायरलः या कॅफेत बदक बनले ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र


चीनच्या एका कॅफेमध्ये एक खास गोष्ट ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. चीनच्या चेंगडू येथील कॅफेमध्ये बदक ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकाला 78 युआन भरून या बदकांबरोबर 90 मिनिटे घालवता येतात. येणारे ग्राहक या बदकाबरोबर सेल्फी देखील काढतात. सोशल मीडियावर या बदकाबरोबरील फोटो पोस्ट करण्यासाठी तरूणांची चांगलीच गर्दी होत आहे.

या कॅफेमध्ये चार पांढरी बदके आहेत. या क्यूट बदकांबरोबर वेळ घालवण्यासाठी ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. या बदकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

एका विद्यार्थीनीने सांगितले की, हे बदक खरचं मजेदार आहेत आणि आज्ञा पाळणारे देखील. या कॅफेबद्दल ऑनलाइन वाचल्यानंतर मी त्वरित या ठिकाणी भेट दिली.

26 वर्षीय लुओ याँची हिने इतर तीन जणांबरोबर मिळून या एनिमल कॅफेची सुरूवात केली आहे. घरात बदक पाळत असताना तिला याबाबतची कल्पना सुचली. येथे येणाऱ्या ग्राहकांना छोट्या डुकरांबरोबर देखील वेळ घालवायला मिळतो. बदकांप्रमाणेच हे छोटे डुकर या कॅफेतील रहिवासी आहेत.

Leave a Comment