या रेस्टोरंटमध्ये जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मिळते 370 रुपये सूट


जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे नागरिक असाल तर दिल्लीच्या कनॉट प्लेस येथील एका रेस्टोरंटमध्ये एका सुपर साइज थाळीवर 370 रूपये डिस्काउंट मिळू शकते. या मोठ्या थाळीमध्ये प्रत्येक राज्यातील पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. आडरेर 2.1 रेस्टोरंट हे हटके पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. सध्या येथे जम्मू-काश्मीरचे ओळखपत्र दाखवल्यावर कलम 370 नावाच्या थाळीवर 370 रूपयांची विशेष सुट मिळत आहे.

येथे शाकाहारी थाळीची किंमत 2,370 रूपये आणि नॉन वेज थाळीची किंत 2669 रूपये आहे. जम्मू-काश्मीरच्या शाकाहारी मेन्यूमध्ये काश्मीरी पुलाव, रोटी,दम आलू अशा गोष्टी मिळतात.

हे रेस्टोरंट या आधी देखील वेगळे नाव असणारी थाळी सुरू करण्यासाठी प्रसिध्द आहे. येथील ‘मोदीजी 56 इंच थाळी’ आणि ‘बाहुबली पिक्चर’ सारख्या थाळ्या देखील खुप लोकप्रिय झाल्या होत्या. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीवेळी देखील येथे ‘युनायटेड इंडिया’ थाळी सुरू केली होती.

Leave a Comment