या 6 देशाचे वाहतुकीचे नियम वाचून तुम्ही देखील डोक्याला हात लावला


मोटार वाहन कायद्यामध्ये भारतात काही दिवसांपुर्वीच बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 पट अधिक दंड भरावा लागत आहे. नियम न मानणाऱ्यांसाठी ही दंडाची रक्कम विचित्र वाटू शकते. मात्र इतर देशांमधील वाहतुकीचे नियम आपल्या देशापेक्षा अधिक विचित्र आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच देशांच्या वाहतुकीच्या नियमांबद्दल सांगणार आहोत.

युएई – युएई केवळ आपल्या कठोर नियमांसाठी ओळखला जात नाही तर येथे या नियमांचे पालन देखील केले जाते. काही दिवसांपुर्वीच येथे कार संबंधी एक कायदा करण्यात आला आहे. या नियमांनुसार जर एखादी व्यक्ती खराब कार सार्वजनिक ठिकाणी पार्क करतो तर त्याला 9000 रूपये दंड भरावा लागतो.

मॉस्को – मॉस्कोमध्ये खराब कार रस्त्यावर चालवल्यावर 50 डॉलरचा दंड आकारला जातो.

स्वीडन – स्वीडनमध्ये दिवसा देखील गाडीची लाइट चालू ठेवणे अनिवार्य आहे. असे न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

जापान – जापानचा एक नियम ऐकून तुम्हा हा नियम भारतात देखील लागू करावा असे म्हणाल. जापानमध्ये जर तुमच्या कारने चालणाऱ्या व्यक्तीवर चिखल उडाला अथवा पाणी उडाले तर तुम्हाला दंड भरावा लागतो.

स्पेन – स्पेनमध्ये जर तुम्ही विना हवाई चप्पल/स्लिपर घालून गाडी चालवली तर तुम्हाला दंड होतो. येथे चप्पल, बुट न घालता गाडी चालवणे बेकायदेशीर आहे.

थायलंड – थायलंडमध्ये जर तुम्ही शर्ट न घालता गाडी चालवली तर तुम्हाला 5 डॉलर दंड भरावा लागेल. तसेच कमर्शियल गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरसाठी ड्रेस कोड आहे.

 

Leave a Comment