या गोष्टीवर अमेरिका करत आहे तब्बल 258 अब्ज रूपये खर्च


सुरक्षा उपकरणांवर लाखो डॉलर खर्च करणारा अमेरिका गेली अनेक दिवसांपासून देशात येणाऱ्या शरणार्थींवर देखील अंकुश घालण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे काम देखील सुरू आहे. मॅक्सिकोमधून घुसखोरी करणाऱ्या नागरिकांवर अंकुश घालण्यासाठी अमेरिका सीमेवर भिंत बांधण्याच्या तयारीत आहे.

मॅक्सिकोच्या सीमेवर बांधण्यात येणाऱ्या 281 किलोमीटर भिंतीसाठी 3.6 अब्ज डॉलर अमेरिका खर्च करणार असल्याचे अमेरिकेचे रक्षामंत्री मार्क एस्पर यांनी सांगितले आहे. यावरून राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प आणि अमेरिकन काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. याआधी 3.6 अब्ज डॉलर ही रक्कम 127 योजनांवर खर्च करण्याचे निश्चित झाले होते.

पेंटागनने स्पष्ट केले आहे की, या रक्कमेचा अर्धा हिस्सा हा सैन्याच्या प्रोजेक्ट आणि अर्धा हिस्सा इतर प्रोजेक्टमधून येणार आहे. मार्क एस्पर यांच्या या निर्णयामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे.

याआधी देखील खासदारांनी ही भिंत बांधण्यासाठी 6 अब्ज डॉलर रक्कम मंजूर करण्यास नकार दिला होता. ज्या योजनांची रक्कम भिंत बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे, ते प्रोजेक्ट कोणते आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ते प्रोजेक्ट रद्द करण्यात आलेले आहेत का याबाबत खासदारांनी विचारणा केल्यावर, ते प्रोजेक्ट रद्द करण्यात आलेले नाहीत, असे पेंटागनकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

डेमोक्रेटिक पार्टीचे नेता चक शुमाकर यांनी देखील ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशाची सेवा करणाऱ्या सैन्याच्या हिस्स्याची रक्कम ट्रंप केवळ स्वतःला संतुष्ट करण्याची वापरत आहेत. ते हे देखील म्हणाले की, ट्रम्प यांनी सांगितले होते की, ही भिंत बनवण्यासाठी मॅक्सिकोकडून पैसा घेण्यात येईल.

ट्रम्प यांनी 5.7 अब्ज डॉलरची मागणी केली होती. मात्र अमेरिकन काँग्रेसने या वर्षीच्या बजेटमध्ये भिंत बनवण्यासाठी 1.375 अब्ज डॉलरची रक्कम मंजूर केली होती. या विरोधात 35 दिवस सरकारी कामकाज बंद ठेवल्यानंतर अखेर ट्रम्प सरकारने ही रक्कम स्विकारली होती.

याप्रमाणे तब्बल 8.1 अब्ज डॉलरची रक्कम भिंत बनवण्यासाठी वापरली जाऊ शकते. यातील 6 करोड डॉलरची रक्कम ट्रेजरी विभाग, 2.5 अब्ज डॉलर रक्षा विभागातील काउंटर ड्रग प्रोजेक्ट आणि 3.6 अब्ज डॉलर सैन्यासाठी असलेल्या योजनांमधून घेण्यात येणार आहे.

Leave a Comment