पी चिदंबरम यांनी तिहारमध्ये या सुविधांची केली मागणी


माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची आयएमएक्स मिडिया केस मध्ये अखेर १९ सप्टेंबर पर्यत तिहार तुरुंगात रवानगी केली गेली आहे. सुप्रिम कोर्टात चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली गेली असून चिदंबरम यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

चिदंबरम यांच्यासाठी वकिलांनी तुरुंगात झेड सुरक्षा, वेगळी कोठडी मागितली असून चिदंबरम यांनी ते वयस्कर असल्याने पाश्चात्य पद्धतीचे टॉयलेट सुविधा दिली जावी अशी विनंती केली आहे. तसेच त्यांचा चष्मा, रोजची गरजेची औषधे बरोबर नेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

चिदंबरम यांना तिहार मधल्या ७ नंबरच्या तुरुंगात ठेवले जाईल असे समजते. या तुरुंगात आर्थिक अपराध संदर्भातील आरोपीने ठेवले जाते.

Leave a Comment