आसुस रोग फोन २, अल्टीमेट एडिशन लाँच


गेमिंग स्मार्टफोन सेगमेंट मध्ये आसुसने रोग (ROG) फोन सिरीज मध्ये खास स्थान मिळविले आहे. त्याच सिरीजमधला रोग फोन २ ची अल्टीमेट एडिशन आयएफए २०१९ मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एडिशन अनेक कारणाने युनीक आहे. या फोनसाठी कंपनीने १ टीबी स्टोरेज दिले असून १२ जीबी रॅम दिली आहे. या फोनची किंमत ११९९ युरो म्हणजे साधारण ९५००० रुपये आहे.

या फोनसाठी खास फीचर्स दिले गेले आहेत. आत्तापर्यंत बाजारात आलेल्या फोनसाठी अधिकाधिक ९० एचझेड एमोलेड स्क्रीन दिला गेला होता, या फोनला १२० एचझेड एमोलेड स्क्रीन दिला गेला असून याप्रकारचा स्क्रीन असलेला हा जगातील पाहिला फोन आहे. फोनसाठी ६.५९ इंची स्क्रीन बिना नॉच, गोर्रीला कॉर्निंग ग्लास सिक्स प्रोटेक्शन आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर असून हा प्रोसेसर असलेला हा पहिलाच फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

फोनच्या रिअरला ४८ एमपी आणि १३ एमपी वाईड अँगल असे दोन कॅमेरे आहेत तर सेल्फीसाठी १३ एमपी कॅमेरा दिला गेला आहे. या फोन साठी ६००० एमएएचची बॅटरी ३० वॉट फास्ट चार्जिंगसह असून इतक्या क्षमतेची बॅटरी असलेला हा पहिलाच स्मार्टफोन असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment