अलिबाबा भारतात येणार


चीनी ई कॉमर्स कंपनी अलिबाबा भारतात याच वित्तीय वर्षात त्यांचा व्यवसाय सुरु करणार आहे. युसीवेबच्या माध्यमातून अलिबाबा भारतात व्यवसाय सुरु करत असल्याचे युसीवेब चे ग्लोबल बिझिनेस उपाध्यक्ष हुइयुआन यांग यांनी सांगितले.

यांग यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीबाबाच्या इ कॉमर्स व्यवसायाचा पेटीएमवर प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण पेटीएममध्ये अलीबाबाचा ३१.१५ टक्के हिस्सा आहे. त्यांची मुख्य स्पर्धा फ्लिपकार्ट आणि अमेझोनबरोबर असेल. स्नॅपडील मध्येही अलिबाबाचा ३ टक्के हिस्सा आहे.

यांग म्हणाले कंपनी प्रत्यक्षात इ कॉमर्स संबंधित नवीन बिझिनेस मॉडेल आणण्याचा प्रयत्न करणार आहे. युवी वेब युसी ब्राउझर भारतात २००९ पासून उपलब्ध आहे आणि जगभरात १.१ अब्ज युजर्सनी ते डाऊनलोड केले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या युजर्स मध्ये अर्धे भारतातील युजर्स आहेत. मंथली युजर्सची संख्या १३० दशलक्ष असल्याचा दावाही यांग यांनी केला आहे. ई कॉमर्स व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे अलीबाबा त्यांच्या व्यवसायानुसार क्षेत्र निवडेल आणि भागीदारी करण्याबाबत प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment