विराट तुझे तर चलान नाही ना फाडले ?


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर विराटला ट्रोल देखील केले जात आहे.

विराटने फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा आपण स्वतःच्या आत झाकून पाहतो, तेव्हा आपल्याला बाहेरचं काहीही बघण्याची गरज राहत नाही.

विराट कोहली या फोटोमध्ये विना शर्टाचा शॉर्ट्सवर बसलेला आहे. विराटच्या या फोटोवर युजर्सने ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका युजरने लिहिले की, चलान कापल्यावर विराट कोहलीचे हे हाल झाले आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अनुष्काने घराच्या बाहेर काढले काय ?

वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल केल्याने युजर चलानवर मिम्स शेअर करत आहे. यामुळे विराटच्या फोटोवर देखील युजर्सने अशा कमेंट्स केल्या.

काही दिवसांपुर्वीच भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरूध्द टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे.

Leave a Comment