युट्यूबवर भारतीय पोस्ट करतात सर्वाधिक बनावट आणि खोटे व्हिडीओ


युट्यूब या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर खोटे आणि अयोग्य माहिती असणारे व्हिडीओ टाकण्याच्या यादीत भारत सलग दुसऱ्यांदा प्रथम स्थानावर आहे. युट्यूबच्या व्हिडीओ कंटेटच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या यादीत भारत, अमेरिका, ब्रिटेन, रशिया आणि ब्राझील सर्वात पुढे आहे. याआधी जानेवारी-मार्च 2019 मध्ये देखील भारत पहिल्या क्रमांकावर होता. ही नको असलेली कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

युट्यूब कम्युनिटी गाइडलाइन्स रिपोर्टनुसार, एप्रिल ते जून दरम्यान जगभरातून 1.08 करोड व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आले. यामध्ये सर्वाधिक बनावटी व खोटे व्हिडीओ हे भारतातून पोस्ट करण्यात आले आहेत. यानंतर अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, मॅक्सिको आणि ब्रिटेनचा क्रमांक आहे.

युट्यूबने म्हटले आहे की, द्वेष पसरवणारे तब्बल 1 लाख व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. तर हे व्हिडीओ टाकणाऱ्या 17 हजारांपेक्षा अधिक चॅनेल बंद करण्यात आले. तर 50 करोड पेक्षा अधिक कमेंट्स देखील युट्यूबवरून काढून टाकण्यात आल्या आहेत.

युट्यूबमधील एका स्वंयमचलित सिस्टिमद्वारे व्हिडीओ हिंसा, द्वेष, खोटे, संदिग्ध इत्यादी भागात विभाजले जातात. या सिस्टमद्वारे युट्यूबवर येणाऱ्या अयोग्य कंटेटवर नियंत्रण ठेवता येते.

Leave a Comment