या प्राण्याच्या संवर्धनासाठी रोहित शर्माची नवीन मोहिम


भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने ग्रेटर वन हॉर्न रायनोच्या (एक शिंगी गेंडा) सुरक्षिततेसाठी जागरूकता अभियान सुरू करणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि एनिमल प्लॅनेट यांच्याबरोबर भागिदारी करत रोहित शर्मा रोहित4रायनो (Rohit4Rhinos) हे अभियान सुरू करत आहे.

22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवसानिमित्त एनिमल प्लॅनेटच्या ह्या अभियानांतर्गत रोहित शर्मा नामशेष होणाऱ्या प्रजातीला वाचवण्यासाठी वचन घेईल.

जगभरात केवळ 3500 भारतीय गेंडे आढळतात. यातील 82 टक्के गेंडे हे भारतात आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश सारख्या मोजक्याच राज्यात हा प्राणी आढळून येतो.

आसामचा राज्य प्राणी असलेला गेंडा सध्या अनेक संकटांमध्ये सापडलेला आहे. रोहित शर्माने 2018 मध्ये गेंड्याच्या संवर्धनासाठी ब्रँड एंबेसेडर म्हणून डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडीयासोबत काम करण्यास सुरूवात केली असून, आता एनिमल प्लॅनेट या चॅनेलने देखील या अभियानात सहभाग घेतला आहे.

याचबरोबर या अभियानासाठी www.rohit4rhinos.org हे एक खास पेज देखील तयार करण्यात आलेले आहे. या अभियानाबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, या प्रजातींचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. या अभियानामुळे अनेक जण जोडले जातील, त्यांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.

यासंदर्भातील व्हिडीओ देखील रोहित शर्माने ट्विटरवर शेअर केला.

https://twitter.com/chandan_264/status/1169177723039674368

व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत व्हिडीओला तब्बल 37 हजारपेक्षा अधिक लोकांनी बघितले असून, 15 हजार जणांनी लाइक्स केले आहे.

 

Leave a Comment