एका ट्विटवरून पुन्हा ट्रोल झाले रवी शास्त्री !


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात भारताने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका आपल्या खिशात घातली.


रवी शास्त्री आणि भारतीय संघ हा दौरा संपल्यानंतर कॅरेबियन भूमीत मजा करताना दिसत आहेत. यातच सोशल मीडियावर रवी शास्त्रींच्या एका फोटोमुळे ट्रोल होत आहेत.


रवी शास्त्री यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये हातात बिअरचा ग्लास पकडलेला दिसक आहे. सोशल मीडियावर या फोटोवर मीम तयार होत आहे.
शास्त्रींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर लोकांनी विविध पोस्टर बनवत, त्यांना ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे.


तर काहींनी दारूड्या, म्हणत रवी शास्त्रींनी ट्रोल केले आहे. तर, काहींनी असे कोच सर्वांना मिळायल हवे असे म्हटले आहे. काहींनी तुम्ही सुधारणार नाही, असे मीम तयार केले आहे. एका चाहत्याने तर ए गणपत चल दारूला, असे ट्विट असे आहे. रवी शास्त्रींचे याआधीही हातात बिअरचे ग्लास असलेले फोटो व्हायरल झाले होते.

Leave a Comment