या ड्रेसमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी


आपल्या अभिनयाची ‘एम. एस. धोनी’, ‘कबीर सिंग’ यांसारख्या चित्रपटांतून छाप पाडणारी अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. नेटकऱ्यांचे विशेष लक्ष त्यापैकी एका फोटोने वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी या ड्रेसवरून तिला ‘मॅगी’ असे म्हणत चिडवले. पण कियाराने या ट्रोलर्सने मजेशीर उत्तर देऊन गप्प केले आहे.

View this post on Instagram

🌼

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on


कियाराने फोटोशूटसाठी अटेलिअर झुहराने डिझाइन केलेला पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. नेटकऱ्यांनी या गाऊनची डिझाइन पाहून त्याची तुलना मॅगी न्यूडल्सशी केली. तुम्हाला जेव्हा मॅगी फार आवडते, अशी कमेंट एकाने केली तर दुसऱ्या युजरने, तुम्ही जेव्हा मॅगी खाऊन कंटाळता आणि त्याचा गाऊन बनवता. अन्न वाया न जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय, म्हटले आहे. नेटकऱ्यांची विनोदबुद्धी पाहून कियाराने तिच्या अंदाजात उत्तर दिले. दोन मिनिटांत तयार झाले, असे उत्तर तिने दिले आहे.

Leave a Comment