इम्रान खान यांची पुर्व पत्नी म्हणते, ‘पाकिस्तानचे पुर्ण सरकारच पप्पू आहे’


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पुर्व पत्नी रेहम खान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारवर सध्या जोरदार टीका करत आहे. काश्मीर प्रश्नावर इम्रान खानचे सरकार तोंडावर पडल्यानंतर रेहम खानने पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

रेहम खानने एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काश्मीर प्रश्नावर इम्रान खान यांच्या सरकारवर जेवढी टीका केली जाईल तेवढी कमीच आहे. तुम्ही कधी म्हैस विकत आहात, तर कधी रस्त्यावर उन्हात उभे राहता. उन्हाळ्यात पाकिस्तानच्या रस्त्यावर उभे राहिल्याने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. लोक या नाटकाला थकले आहेत. इम्रान खान यांनी सत्ते येताच पंतप्रधान आवासामधील म्हैस विकत पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

रेहम खान म्हणाली की, इम्रान खानचे सरकार व्यवस्थितरित्या काश्मीरचा प्रश्न उपस्थित करू शकले नाही, त्यामुळे मी त्यांना पप्पू म्हणते. याचबरोबर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी उमरकोटला जातात. उमरकोटमध्ये हिंदूचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन केले जाते, याविषयी मला बोलायला लावू नका, असेही ती म्हणाली.

इम्रान खान यांची पुर्व पत्नी म्हणाली की, नरेंद्र मोदी यांनी काश्मीर तुमच्याकडून काढून घेतला तुम्हाला समजले देखील नाही. तुम्ही मोदींना वाईट बोलून काश्मीर परत घेऊ शकत नाही. लोकांना वेडे बनवणे सोडून द्या.

 

Leave a Comment