‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये झळकणार ‘हा’ नवखा अभिनेता


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘दोस्ताना’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल दिग्दर्शक करण जोहर तयार करत असून या सिक्वेलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात त्यांच्यासोबत छोट्या पडद्यावरील एक नवा चेहरा झळकणार आहे.


‘दोस्ताना’च्या सिक्वेलमध्ये टीव्हीस्टार लक्ष्य हा भूमिका साकारणार आहे. त्याची धर्मा प्रोडक्शनच्या ४ प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली आहे. यामध्ये वेबसिरीजचाही समावेश आहे.


याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे.

Leave a Comment