लाचखोर वाहतुक पोलिसांवर ही होणार कारवाई


मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. ट्रॅफिक चलान दरम्यान लाच रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता ट्रॅफिक पोलिसांना चलान करताना बॉडी कॅमेरा परिधान करावा लागणार आहे. एवढेच नाही तर पोलिस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. जर एखाद्या पोलिस कर्मचाऱ्यांने लाच मागितली तर त्याला दुप्पट दंड भरावा लागेल.

ट्रॅफिक पोलिस ज्वाइंट कमिश्नर मीनू चौधरी यांनी दिल्लीच्या पोलिस कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करावे. जर एखादा कर्मचारी नियम तोडतो तर त्याला दुप्पट दंड भरावा लागेल

नवीन मोटार वाहन कायद्याच्या सेक्शन 201 ब अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांवर हा कायदा लागू करण्याचा अधिकार आहे. अशा कर्मचाऱ्यांनी जर स्वतः नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दुप्पट दंड द्यावा लागेल.

ज्वाइंट कमिश्नर नरेंद्र सिंह बुंदेला म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी कर्मचारी बॉडी कॅमेरा परिधान करतील. उल्लंघन आणि चलान रेकॉर्ड करण्यासाठी 626 बॉडी- कॅमेऱ्याचा वापर केला जाईल.

Leave a Comment