सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला चिदंबरम यांचा जामीन अर्ज


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला असून दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात पी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिले होते. पण त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आयएनएक्स मीडिया प्रकरणी तपास सुरु आहे.

अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा आणू शकते. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment