बजाज ऑटो लाँच करणार पल्सर 125 चे नवे वेरिएंट


बजाज ऑटोने काही दिवसांपुर्वीच पल्सर सिरीजमधील नवीन पल्सर 125 निऑन लाँच केली होती. कंपनीने ही दोन वेरिएंट ड्रम आणि डिस्क ब्रेकमध्ये उपलब्ध केली होती. मात्र आता बजाज लवकरच पल्सर 125 चे आणखी एक नवीन वेरिएंट लाँच करणार आहे. खास गोष्ट म्हणजे लाँचच्या आधीच हे मॉडेल बजाज डिलरशीप पर्यंत पोहचली आहे व डिलर्संनी बुकिंग घेण्यास देखील सुरूवात केली आहे.

नवीन प्लसर 125 मध्ये स्प्लिट सीट, टँक श्रौड्स, नवीन ग्राफिक्स, बेली-पॅन, क्रोम फिनिश टँक आणि कार्बन फाइबर फिनिश सारखे अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. हे नवीन बदल सध्या असलेल्या बाइकच्या तुलनेत थोडे वेगळे असतील.

इंजिनबद्दल सांगायचे तर या नवीन मॉडेलमध्ये DTS-i पेटेंट टेक्नोलॉजीचे 4 स्ट्रोक, 2 वाल्व, 125cc चे बीएस-IV इंजिन आहे. हे इंजिन 12 पीएसची पॉवर आणि 11एनएम टार्क देईल. याचबरोबर यामध्ये 5-स्पीड गियरबॉक्स सोबत एक प्रायमरी किक देण्यात आली आहे. ज्यामुळे राइडर कोणत्याही गेअरमध्ये केवळ क्लच दाबून गाडी स्टार्ट करू शकेल. एक लीटर पेट्रोलमध्ये ही गाडी 57 ते 58 किलोमीटरचे मायलेज देईल.

सध्या बाजारात असलेल्या पल्सर 125 निऑनची किंमत 64 हजार रूपये (ड्रम ब्रेक) आणि 66,618 रूपये (डिस्क ब्रेक) आहे. मात्र नवीन येणाऱ्या पल्सर 125 ची किंमत यापेक्षा 3 ते 4 हजार जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र पल्सर 150 पेक्षा कमी किंमत असेल.

Leave a Comment