हुवावे मेट ३० प्रो ७ कॅमेऱ्यांसह येणार


दिग्गज चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी हुवावे त्यांची नवी मेट ३० सिरीज १९ सप्टेंबरला लाँच करत असल्याचे जाहीर करण्यात आले असून जर्मनीच्या म्युनिक शहरात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कंपनी ३ स्मार्टफोन लाँच करणार असून मेट ३०, मेट ३० प्रो अन मेट ३० लाईट अशी त्यांची नावे आहेत.

पैकी मेट ३० प्रोची फीचर्स लिक झाली असून त्यानुसार या फोनला ५ के रेझोल्युशनचा ३६० डिग्री कॅमेरासेट अप दिला जाणार आहे असे समजते. फोनला प्रीमियम ग्लास मेटल बॉडी असेल. रिअरला क्वाड कॅमेरा सेटअप असेल तर फ्रंटला ट्रिपल कॅमेरा सेट दिला जाईल. म्हणजे या फोन मध्ये सात कॅमेरे असणार आहेत.

फोनला वॉटरफॉल स्क्रीन डिझाईन सह अधिक पातळ बेजल असलेला डिस्प्ले दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे. फोनसाठी ६.७१ इंची ओलेड डिस्प्ले, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज, ४५०० एमएएचची बॅटरी, दिली जाणार आहे.

Leave a Comment