वोल्वोची १.४२ कोटींची थ्री सीटर कार लाँच


वोल्वोने भारतात त्यांच्या फ्लॅगशिप एसयुवी एक्ससी ९० चे टॉप व्हेरीयंट लाँच केले आहे. वोल्वो एक्ससी ९० एक्सलंस लाउंज कन्सोल या नावाने ही लग्झरी कार बाजारात आली असून तिची किंमत आहे १ कोटी ४२ लाख रुपये. विशेष म्हणजे ही कार थ्री सीटर असून तिची लिमिटेड एडिशन काढली जात आहे. या कारचे बुकिंग सुरु झाले आहे.


या कारला युनिक थ्री सीटर लुक दिला गेला असून कारच्या पुढच्या भागात को ड्रायव्हरच्या सीटच्या जागी मल्टीफंक्शन मोड्यूल दिले गेले आहे. १७ इंची टचस्क्रीन डिस्प्ले, टेबल, फूड रेस्ट, स्टोरेज कम्पार्टमेंट असा विविध प्रकारे त्याचा वापर करता येणार आहे. मागच्या बाजूला २ वेगवेगळ्या कॅप्टन सीट्स असून त्या वाकविता येतात. बॉटल, ग्लास होल्डर सह यात फ्रीज, हीटेड/ कुल्ड कप होल्डर व हँडमेड क्रिस्टल ग्लास सुविधा आहे. सीट लेदरच्या आहेत.

या कारला २.० लिटर ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड व सुपर चार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले गेले असून ते इलेक्ट्रिक मोटर ला जोडले गेले आहे. प्युअर, हायब्रीड आणि पॉवर असे तीन ड्रायव्हिंग मोडस असून प्युअर मोड मध्ये ही कार सिंगल चार्जवर ४० किमी अंतर कापू शकेल. या कारला ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी ५.८ सेकंद लागणार आहेत.

Leave a Comment