बिग बी च्या प्रतीक्षा बंगल्यात घुसले पावसाचे पाणी


मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहेच पण बॉलीवूड कलाकारही पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. मुंबईत पावसाचे पाणी साठून ठीकठिकाणी जलाशयाचे स्वरूप आले आहे. बॉलीवूड शेहनशाह बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरचे रस्ते जलमय झाले असून बिग बीच्या बंगल्याच्या आवारात पाणी शिरले आहे. त्याचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यात गेटच्या आत पाण्याचा जोरदार प्रवाह शिरत असून दारात उभा असलेला वॉचमन दिसत आहे.

या पावसाचा फटका अभिनेता आणि खासदार सनी देओल यालाही बसला असून त्याचा मुलगा करन देओल आणि साहेर बम्बा यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. करण आणि साहेरच्या पल दिल के पास या चित्रपटाचे ट्रेलर आज लाँच केले जाणार होते. सनी देओल ने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून हे ट्रेलर उद्या दुपारी १२ वा.३० मिनिटाने लाँच केले जाईल असा मेसेज व्हिडीओच्या माध्यमातून दिला गेला आहे.

Leave a Comment