लाखो लोकांनी डाउनलोड केल्याने या लोकप्रिय अ‍ॅपचे सर्व्हर क्रॅश


काही दिवसांपुर्वी एक फेस अ‍ॅप अचानक व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर युजर्स फेस अ‍ॅपच्या मदतीने आपले म्हतारपणी कसे दिसू असे फोटो शेअर करत होते. मात्र काही दिवसांनी या अ‍ॅपची चर्चा थांबली. मात्र आता पुन्हा एकदा असेच फेस स्वॅपिंग अ‍ॅप व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप एखाद्याचा चेहरा बदलून त्याला हिरो देखील बनवू शकते.

या अ‍ॅपचे नाव झाओ (ZAO) असून, चीनमध्ये हे अ‍ॅप चांगलेच व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप सध्या केवळ आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने तुमचा चेहरा एखाद्या सेलिब्रिटीच्या चेहऱ्यात बदलू शकता. वैशिष्ट्य म्हणजे या अ‍ॅपच्या मदतीने एखाद्या व्हिडीओ मधील सेलिब्रिटीचा चेहरा सहज बदलता येतो.


या अ‍ॅपची लोकप्रियता एवढी आहे की, अ‍ॅप प्ले स्टोरवर लाँच होताच काही तासातच व्हायरल झाले आणि जास्त ट्रॅफिकमुळे अ‍ॅपचे सर्वर देखील क्रॅश झाले.

या अ‍ॅपबद्दल अनेक तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तंज्ञांच्या मते, अ‍ॅपच्या मदतीने फोटो अथवा व्हिडीओमध्ये चेहरा बदलता येतो. अशावेळेस व्हिडीओ खरा आहे की, खोटा याबाबत शंका निर्माण होईल.

हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अकाउंट बनवावे लागते आणि स्वतःचा फोटो अपलोड करावा लागतो. त्यानंतर अ‍ॅपमध्ये दिसणाऱ्या सेलिब्रिटिच्या व्हिडीओमध्ये तुम्ही चेहरा बदलून तुमचा चेहरा लावू शकता.

Leave a Comment