फेक अकाऊंटच्या माध्यमातून या रिक्षावाल्याने पटवल्या तब्बल 3 हजार पोरी


लखनऊ : तब्बल तीन हजार मुलींची एका रिक्षावाल्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये ही घटना घडली. फेसबुकवरुन फेक अकाऊंटद्वारे या रिक्षावाल्याने तब्बल तीन हजार मुलींची फसवणूक करत त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या आरोपी रिक्षावाल्याचे नाव जावेद असे आहे. जावेदला (52) पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहे.

आयपीएस नरुल हसन नावाने जावेदने फेसबुकवर एक फेक अकाऊंट बनवले होते. त्याने या अकाऊंटद्वारे हजारो लोकांसोबत मैत्री केली होती. यामध्ये मुलींची संख्या अधिक होती. फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर जावेद दररोज मुलींसोबत अश्लील चॅटिंग करत होता. तसेच त्याने त्यातील अनेक मुलींशी लग्न करण्याची इच्छाही दर्शवली होती. जावेद मुलींसोबत चाटिंग करताना त्यांच्याकडे नग्न फोटो मागत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून काही मुलींनी नग्न फोटोही पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.

जावेदचा फोन तपासला तेव्हा त्यामध्ये तो सध्या 16 मुलींसोबत चॅट करत होता. यात अनेक अश्लील आणि न्यूड फोटोही मागितल्याचे मेसेजही होते. जावेद खरच आयपीएस अधिकारी आहे का? हे जाणून घेण्यासाठी अनेक मुली व्हिडीओ कॉल करत होत्या. पण तो फोन उचलत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपल्या नवऱ्याच्या चाळ्याबद्दल पत्नीला देखील माहित होते. पतीच्या फोनमध्ये तिने अनेक मुलींचे नग्न फोटो पाहिले होते. तिने रागात पतीचा पाच वेळा फोनही फोडला होता. पतीच्या या सवयीमुळे पत्नीही कंटाळली होती. काम सोडून जावेद दिवस-रात्र फक्त मुलींसोबत बोलत असायचा.

Leave a Comment