1 हजार वर्ष जुन्या गणेश मंदिरात पुजा करण्यासाठी एक वर्ष आधी करावे लागते बुकिंग


सर्वत्र गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका खास गणेश मंदिराविषयी सांगणार आहोत. राजस्थानच्या बांसवाड जिल्ह्यातील तलवाडा येथे 11 व्या शतकातील श्री सिध्दी विनायकाचे मंदिर आहे.

या मंदीरावर 282 सुवर्ण कळस आहेत. येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवाप्रमाणेच गणेश जन्मोत्सव साजरा करण्याची देखील मोठी परंपरा आहे. या निमित्ताने गणपतीला पाळण्यात ठेऊन झोका देण्याची देखील प्रथा आहे.

या मंदिराची लोकप्रियता एवढी आहे की, गणेशोत्सवानिमित्त पुजा अर्चना करण्यासाठी एक वर्ष आधीच बुकिंग करावे लागते. खास गोष्ट म्हणजे येथील गणरायाची मुर्ती ही चिंचेच्या झाडाखाली आहे. त्यामुळे या मंदिराचे नाव हिंदीत आमलिया गणेश मंदिर असे देखील आहे.

Leave a Comment