नेटफ्लिक्सचा आगामी चित्रपट ‘द व्हाइट टायगर’मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता राजकुमार राव पहिल्यांदाच सोबत काम करताना दिसणार आहेत. लेखक अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इराणी-अमेरिकन दिग्दर्शक रामिन बहरानी करणार आहे.
नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव दिसणार सोबत
याविषयी बोलताना प्रियंका म्हणाला की, अरविंद अडिगा यांची ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी नेटफ्लिक्स आणि रामिन बहरानीबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. हे पुस्तक वाचल्यावर मी खुपच प्रभावित झाले होते. तसेच, राजकुमार राव आणि भारतात चित्रपटाच्या शुटिंगसाठी उत्सुक असल्याचे देखील तिने म्हटले आहे.
राजकुमार रावने देखील या वर्ल्ड क्लास प्रोजेक्टमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. ‘द व्हाइट टायगर’ ही कांदबरी एका चहा विक्रेत्याचा यशस्वी उद्योगपतीपर्यंतचा प्रवास दाखवते. त्याचबरोबर प्रेम, खून आणि वर्ग संघर्ष इत्यादी गोष्टींवरही भाष्य करते. लेखक अरविंद अडिगा यांचे हे पहिलेच पुस्तक होते व यासाठी त्यांना मॅन बुकर पुरस्कार देखील मिळालेला आहे.