या अॅपमुळे नाही होणार वाहतुक पोलिसांची कारवाई


एक सप्टेंबरपासून वाहतुक नियमांमध्ये बदल झाले असून, दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. नवीन नियम लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. मात्र तुमच्या मोबाईलमध्ये जर हा एक अॅप असेल तर तुम्ही चलानपासून वाचू शकता. चला तर मग या अॅपबद्दल जाणून घेऊया.

मागील वर्षी परिवहन मंत्रालयाने आयटी अॅक्टनुसार सांगितले होते की, ड्रायव्हिंग लायसेन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इंश्योरेंस पेपर सारख्या कागदपत्रांची ओरिजनल प्रत तपासणीसाठी घेतली जाणार नाही. मंत्रालयाने सांगितले होते की, डिजीलॉकर आणि एमपरिवहन अॅपवर असलेल्या कागदपत्रांच्या डिजीटल प्रतीला मान्य केले जाणार आहे. केंद्र सरकारने देखील राज्य सरकारला आणि ट्रॅफिक पोलिसांना ओरिजनल कागदपत्रे न मागण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक पोलिस आता मोबाईलद्वारे ड्रायव्हर अथवा गाडीची माहिती क्यूआर कोडद्वारे डाटाबेसमधून मिळवू शकतात आणि ड्रायव्हरने वाहतुकीचे नियम तोडल्याचा रेकॉर्ड देखील ठेवता येतो.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये डिजीलॉकर किंवा एमपरिवहन अप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर साइन अप करून मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबरवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून तुम्ही वेरिफाई करू शकता. त्यानंतर तुमचे डिजीलॉकर अकाउंट सुरू होईल. त्यानंतर तुम्ही त्यात आधारकार्ड रजिस्ट्रेट करू शकता. आधारकार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल. ओटीपी टाकल्यानंतर आधारकार्ड जोडले जाईल.

यानंतर तुम्ही डिजीलॉकरमध्ये आरसी, लायसेन्स आणि इंश्योरेंस ठेऊ शकता आणि पोलिसांनी मागितल्यावर त्यांना दाखवू शकता. एमपरिवहन अॅपमध्ये गाडीच्या मालकाचे नाव, रजिस्ट्रेशन तारीख, मॉडल नंबर, इंश्योरेंस इत्यादी गोष्टींची माहिती असते. या अॅपमुळे कोणतीही कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज पडत नाही.

Leave a Comment