5000 एमएएच बॅटरी असलेला ‘हा’ स्मार्टफोन झाला लाँच, किंमत रू. 6,999


इनफिनिक्स कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन हॉट 8 लाँच केला आहे. कंपनी हॉट 8 ला ‘एक मोठी सुरूवात’ या टॅगलाइनखाली प्रमोट करत आहे. या फोनमध्ये तब्बल 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत केवळ 6,999 रूपये असून, फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. 12 सप्टेंबरपासून या फोनचा सेल सुरू होणार आहे.

फोनमध्ये 6.5 इंचचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्यामध्ये मिनी ट्रॉप नॉच देण्यात आले आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ पी22 प्रोसेसर देण्यात आला असून, ग्राफीक क्वॉलिटीसाठी IMG PowerVR GE8320 जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

कॅमेऱ्याविषयी सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चर बरोबरच 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगा पिक्सल डेप्थ सेंसर आणि लो लाइट सेंसर देखील आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनची खास गोष्ट म्हणजे यात 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, कंपनीनुसार, फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 22.5 तासांचा टॉकटाइम आणि 14 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देण्यास सक्षम आहे. हा फोन अँड्राइट 9.0 पायवर आधारित  XOS 5.0 वर कार्य करतो.