117 दिवस ब्रेन डेड महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू


चेक रिपब्लिक येथे 4 महिन्यांपासून ब्रेन डेड असलेल्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. 27 वर्षीय गर्भवती महिलेला एप्रिलमध्ये बर्नो हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक अंग खराब झाल्यानंतर मेंदूने देखील काम करणे बंद केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला ब्रेन डेड घोषित केले होते. त्यानंतर 117 दिवसांनी डॉक्टरांनी महिलेचे प्रसुती केली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर तीन दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला.

लहान बाळाचे वजन सव्वा दोन किलो होते आणि लांबी 42 सेंटीमीटर आहे. ती पुर्णपणे स्वस्थ आहे. बर्नो हॉस्पिटलने सांगितले की, महिलेला हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, त्यानंतर परिस्थितीबघून बाळाला प्रथम प्राधान्य देण्यात आले.

डॉक्टरांनुसार, महिलेची प्रसुती सिजेरियन झाली. महिलेला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, त्यावेळी महिला 27 आठवड्यांची गर्भवती होती. डॉक्टरांनी प्रेंग्नेंसी सुरू राहण्यासाठी महिलेला आर्टिफिशियल सपोर्ट सिस्टमवर ठेवले होते. याचबरोबर रोज महिलेच्या पायांची मुव्हमेंट केली जात असे, जेणेकरून बाळाच्या वाढीचा अंदाज येईल.

हॉस्पिटलमधील प्रसुती प्रमुख पावेल वेंचुरा यांनी सांगितले की, बघितले गेले तर ही एक विलक्षण केस होती. महिलेचे संपुर्ण कुटुंब बाळाला वाचवण्यासाठी सोबत होते. त्यांच्या समर्थनाशिवाय बाळाला वाचवणे शक्य नव्हते.

Leave a Comment