चांद्रयान 2 पोहचले चंद्राच्या अंतिम कक्षेत


अवघा येत्या 7 सप्टेंबरची वाट देश पाहत असून हा दिवस भारतीय अंतराळासाठी ऐतिहासिक ठरणार असून चंद्राच्या पृष्ठस्थळावर चांद्रयान 2 उतरणार आहे. तत्पूर्वी विक्रम लँन्डरला आज पहाटे 3.42 मिनिटांनी 9 सेकेंदाच्या प्रक्रियेत चंद्राच्या जवळ असणाऱ्या कक्षेत पाठवण्यात आले आहे. तसेच विक्रम लँन्डर चंद्रापासून 35 किमी दूर अंतरावर आहे. त्यानंतर जवळजवळ 44-45 तासांनंतर विक्रम लँन्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. विक्रम लँन्डर त्यावेळी चंद्राच्या सर्वात जवळील अंतर 35 किमी आणि जास्तीत जास्त 101 किमी आहे.


तसेच चंद्रापासून जवळ 96 किमी आणि जास्तीत जास्त 125 अंतरावर ऑर्बिटर आहे. आता विक्रम लँन्डर आणि ऑर्बिटर चंद्राच्या चारही बाजूंनी अंडाकार कक्षेत 2 किमी प्रति सेकेंदच्या वेगाने गोलाकार फिरत आहेत. चांद्रयान 2 चे तीन भाग आहेत. त्यामधील पहिला ऑर्बिटर, दुसरा-विक्रम लँन्डर आणि तिसरा-प्रज्ञान रोवर. तर विक्रम लँन्डरच्या आतमध्येच प्रज्ञान रोवर असून तो चंद्रावर उतरल्यानंतर वेगळा होणार आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यासाठी 6 आणि 7 सप्टेंबरच्या रात्री 1.30 वाजल्यापासून ते पहाटे 5.10 मिनिट पर्यंतची वेळ महत्वपूर्ण असणार आहे. तर प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर पहाटे चालण्यास सुरुवात करणार आहे. यावेळी रोवरची स्पीड एक सेंटीमीटर प्रति सेकंद ठेवण्यात येणार असून पुढील 14 दिवस चंद्रावर राहणार आहे.

Leave a Comment