बाप्पाचे वाहन उंदराविषयी आश्चर्यकारक माहिती


गणपती बाप्पाचे वाहन आहे उंदीर. लंबोदर बाप्पाचे वाहन चिमुकला उंदीर असावा हे एक आश्चर्य आहेच पण उंदीर हा प्राणी दिसायला लहान असला तरी महाउपद्व्यापी आहे. कोणत्याही प्रकारची वस्तू कुरतडण्यात उंदीर माहीर आहे पण ऐकून आश्चर्य वाटेल कि उंदराच्या वयाचा विचार केला तर फार थोडे उंदीर त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा करतात असे आढळले आहे म्हणजे त्याचे आयुष्य कमी असते.

उंदीर दिसायला चिमुकला असला तरी बुद्धिमान आहे. त्याच्या समोर साधे आणि मादक पदार्थ घातलेले पाणी ठेवले तर तो ड्रग असलेले पाणी पिण्यास प्राधान्य देतो. सलग तीन दिवस पाण्यात तरंगू शकतो, तीन मिनिटांपर्यंत श्वास रोखू शकतो. टॉयलेट फ्लश केले तरी पाण्यात जिवंत राहू शकतो. उंदराची आठवण भयंकर तेज असते त्यामुळे गेल्या रस्त्याने तो बिनचूक माघारी येऊ शकतो.


उंदराची नजर तेज नाही पण वास घेण्याची आणि चव चाखण्याची त्याची शक्ती जबरदस्त असते. उंदीर मारण्याचे औषध आपण टाकले असेल तर ते थोडे खाल्ले तरी त्याची चव उंदराच्या नेहमी लक्षात राहते. फ्रांसने १९६१ साली पहिला उंदीर अंतराळात पाठविला होता. इंग्लिश मध्ये उंदरासाठी माउस, माईस, रॅट असे शब्द आहेत. पैकी माउस हा शब्द संस्कृत मस या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ आहे चोर.

उंदराची पिले जन्माला घालण्याची क्षमता अलौकिक आहे. दीड वर्षात उंदीर दोन लाख पिले जन्माला घालू शकतो. एक उंदरी वर्षात १५ वेळा सहा तासात ५०० वेळा उंदराबरोबर संभोग करू शकते. तीन ते चार महिन्याचे उंदीर सेक्स लायक बनतात. राजस्तान येथे असलेले देशनोक कर्णिमाता मंदिर उंदरासाठी प्रसिद्ध असून तेथे शेकड्याने उंदीर आहेत. उंदीर ५० फुट उंचावरून पडला तरी जखमी होत नाही. त्याला वेदना होत नाहीत आणि मांजर आणि उंदीर दोघेही समुद्राचे पाणी पिऊ शकणारे प्राणी आहेत. तुमचा जन्म १९१२, १९२४, १९३६ असा दर बारा वर्षांनी येणाऱ्या वर्षातला असेल तर चीनी पंचांगाप्रमाणे तुम्ही उंदीर आहात.


१९ व्या शतकात लंडन मध्ये रॅट बेटिंग हा प्रसिद्ध खेळ होता. यात माणूस, कुत्रा यांनी कमीतकमी वेळात जास्त उंदीर मारायचे असे त्याचे स्वरूप होते. १८६२ मध्ये जॅको नावाच्या माणसाने ५ मिनिटात १०० उंदीर मारून रेकॉर्ड केले होते. व्हायरल ताप, प्लेग अश्या ३५ रोगांना उंदीर कारणीभूत असतात. उंदराला बेंबी असते. उंदीर उलटी करू शकत नाही. जगातला सर्वात मोठा उंदीर छोट्या कुत्र्याएवढा असून त्याची लांबी ३ फुट आहे तर सर्वात वजनदार उंदीर ४ किलोचा असू शकतो. उंदरांना प्रशिक्षण दिले तर ते जमिनीतील सुरुंग शोधू शकतात.

कांगारू उंदीर हे वाळवंटी असून संपूर्ण आयुष्यात पाण्याचा एक थेंब न पिताही जगू शकतात. उंदराला गुदगुल्या होतात आणि ते हसतात. त्याचे हृद्य मिनिटाला ६३२ वेळा धडकते. उंदराचे दात सतत वाढतात त्यामुळे काही न काही कुरतडून तो दात घासत राहतो. उंदीर तार, सिमेंट, लाकूड, कपडे, प्लास्टिक, काच, अल्युमिनियम सुद्धा कुरतडू शकतो.

Leave a Comment