जम्मू काश्मीरमध्ये रिसोर्ट बांधणारे पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र


जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लदाख मध्ये जमीन घेऊन रिसोर्ट बांधणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनणार आहे. या निर्णयाला फडणवीस सरकार कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची महाराष्ट्रात अनेक रिसोर्ट आहेत. त्याच धर्तीवर काश्मीरच्या पहेलगाम येथे आणि लदाखच्या लेह मध्ये २ रिसोर्ट बांधली जाणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये जमीन विकत घेतली जात असून योग्य जमिनीचा शोध घेण्यासाठी सदस्य समिती काश्मीरला जात असल्याचे समजते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनत आहेच पण याचा फायदा महाराष्ट्रातील पर्यटकांना होणार आहे. तसेच वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनाही त्याचा लाभ मिळू शकणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Comment