भल्या भल्या पहिलवान प्रतिस्पर्धीना अस्मान दाखविणारी आणि दंगल चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली स्टार पहिलवान गीता फोगाट सध्या नाजूक अवस्थेत आहे. गीताच्या घरी पहिला पाळणा हलणार असून बेबी बम्प दाखविणारा, नयनरम्य पहाडी इलाख्यात काढलेला फोटो गीताने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. गीताने दिलेल्या या बातमीमुळे तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दंगलगर्ल गीता फोगाटच्या घरी हलणार पाळणा
कॉमनवेल्थ स्पर्धेत रेसलिंग मध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारी गीता पहिली भारतीय पहिलवान आहे. २०१६ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पाहिलवान पवनकुमार याच्याशी लग्न केले आहे. गीताने रेसलिंग मध्ये अनेक पदकांची कमाई केली आहे. आपल्या प्रेग्नन्सीचा फोटो शेअर करताना गीताने एक भावूक नोट लिहिली आहे. ती म्हणते, एका आईचा खरा आनंद तेव्हा सुरु होतो जेव्हा तिच्या गर्भात एक नवीन जीव आकार घेत असतो. प्रथमच एक छोटीशी धकधक, एक छोटीशी लाथ तिला जाणवते तो आनंद सांगता येत नाही. पण त्यासोबत या छोट्याला तू एकटा नाहीस याची खात्री आई देत असते.