आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावर रणवीरचा रॅप


बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंग याचे क्रीडा प्रेम लोकांपासून लपलेले नाही. नुकतेच त्याचे फुटबॉल प्रेमही आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावर दिसून आले. नॉर्दन लंडनच्या आर्सेनल क्लब विरुद्ध टोटेनहम हॉटसपूर यांच्यात झालेल्या एका फुटबॉल सामन्यासाठी रणवीर या मैदानावर उपस्थित होता आणि तेथे त्याने मैदानावरच रॅप आणि डान्स करून फोटोशूटही केले. त्याच्या या डान्सला उपस्थित चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

रणवीर गेले दोन महिने लंडन मध्ये चित्रपट ८३ च्या शुटींग निमित्ताने मुक्काम ठोकून आहे. शनिवारी रणवीरने शॉर्ट क्लिप पोस्ट केली असून त्यात त्याच्या एका हातात ग्लास दिसत आहे. यातून त्याने ८३ चे शुटींग संपल्याचा संकेत दिला असून चिअर्स, एट ८३ द फिल्म, शेड्युल रॅप असे लिहिले आहे.

या चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार असून भारताने प्रथम १९८३ साली जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर हा चित्रपट आधारित आहे. यात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका दीपिका करणार आहे.

Leave a Comment