फेडरल न्यायाधीश पदासाठी भारतीय वंशाच्या महिलेचे नामांकन


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्या फेडरल न्यायाधीश (संघीय न्यायाधीश) पदासाठी मूळ भारतीय वंशाच्या  शिरीन मैथ्यूज यांना नामांकित केले आहे. आशिया-अमेरिका संस्था नॅशनल पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने म्हटले आहे की, जर त्यांचे नाव निश्चित झाले तर त्या या पदावर पोहचणाऱ्या आशिया पॅसिफिक भागातील पहिल्या महिला असतील. त्याचबरोबर त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन असतील ज्या आर्टिकल थर्ड फेडरल जज बनतील.

आर्टिकल थर्ड न्यायाधीश हे आपल्या चांगल्या धोरणामुळे या पदावर पोहचतात. आर्टिकल थर्ड न्यायाधीशांना हाउस ऑफ रिप्रजेंटेटिवद्वारे महाभियोग आणि सीनेटकडून दोषी ठरवल्यानंतरच पदावरून हटवले जाऊ शकते. सध्या मैथ्यूज या सैन डिएगो येथे अमेरिकेतील पाचवी सर्वा मोठी लॉ फर्म जॉन्स डे मध्ये भागिदार आहेत.

व्हाइट हाउसने सांगितले आहे की, या फर्ममध्ये सहभागी होण्याआधी मैथ्यूज कॅलिफोर्निया येथे असिस्टेंट युनायटेड स्टेंट्स अटॉर्नी पदावर कार्यरत होत्या. त्याआधी त्या लाथम आणि वाटकिन्स एलएलपी या फर्मशी देखील जोडलेल्या होत्या.

एनएपीएबीएचे अध्यक्ष डेनियल साकागुची हे म्हणाले की, शिरीन मैथ्यूज या अनुभवी वकील आहेत. त्यांना सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्राचे ज्ञान आहे. मैथ्यूज यांनी जॉर्जटाउन युनिवर्सिटीमधून ग्रेज्युएशन आणि ड्युक युनिवर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून लॉची डिग्री घेतली आहे.

Leave a Comment