प्रशिक्षक बेशुध्द पडल्याने चक्क विद्यार्थ्याने केले विमानाचे लँडिग


ऑस्ट्रेलियातील जेंडाकोट विमानतळावर उड्डाण प्रशिक्षणासाठी विमानात बसलेल्या विद्यार्थ्याला एका वेगळ्याच घटनेला सामोरे जावे लागले आहे. विमान उड्डाण प्रशिक्षण घेत असताना 6200 फुट उंचावर ट्रेनर बेशुध्द पडला. अशावेळी विमानात असलेल्या विद्यार्थ्याने यशस्वीरित्या सुरक्षितपणे विमानाचे लँडिंग केले.

ऑस्ट्रेलियाच्या जेंडाकोट विमानतळावर ट्रेनर रॉबर्ट मोलार्ट दोन सीट असणाऱ्या सेसना विमानात 30 वर्षीय विद्यार्थी मॅक्स सिल्वेस्टरला उड्डाण प्रशिक्षण देत होता. विमान 6200 फुट उंचावर असताना अचानक ट्रेनर रॉबर्ट मोलार्ड बेशुध्द झाला. अशावेळी विमान लँड करण्याची पुर्ण जबाबदारी विद्यार्थ्यावर आली.

ट्रेनर बेशुध्द झाल्याचे बघून मॅक्स सिल्वेस्टरने पॅनिक बटन दाबत ट्रॅफिक कंट्रोलरकडे मदत मागितली. सिल्वेस्टर कंट्रोलरला सांगता होता की, ट्रेनर माझ्या खांद्यावर डोके ठेऊन बेशुध्द पडला आहे. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ते उठत नाही.

यावेळी कंट्रोलरने या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला सुचना देत 20 मिनिटामध्ये सुरक्षित लँडिंग केली. सिल्वेस्टरचे हे पहिलेचे उड्डाण असल्याने यावेळी त्याची तीन मुले आणि पत्नी देखील उपस्थित होती.

ट्रेनरला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. एअर ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनलचे मालक चक मॅक्लवे यांनी सांगितले की, स्थिती खुपच खराब होती, काहीही घडले असते. मात्र मोठा अपघात टळला.

Leave a Comment