8 महिन्यात 51 देशांचा प्रवास करणार क्रुझ


वायकिंग सन नावाचे क्रुझ रविवारी आठ महिन्यांचा वर्ल्ड टूरसाठी रवाना झाले आहे. क्रुझ 251 दिवसांच्या या प्रवासात 51 देशातील 111 पोर्टवर जाणार आहे. हा प्रवास 2 मे 2020 ला लंडन येथे समाप्त होईल. या क्रुझमधील प्रवाशी 23 शहरांमध्ये एकारात्रीसाठी जमीनीवर देखील थांबतील. यामध्ये मुंबईचा देखील समावेश आहे. या क्रुझचे सर्वात स्वस्त तिकीट 59 लाख रूपयांचे आहे. तर सर्वात महागडे तिकीट 1.7 करोड रूपयांचे आहे. आठ महिन्यांच्या या प्रवासाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील होणार आहे. 245 दिवसांच्या या प्रवासासाठी 54 लोकांनी तिकीट खरेदी केले आहे.

हे क्रुझ अंटार्टिका सोडून सर्वच कॉन्टिनेटमधून जाणार आहे. यावर क्लासिकल म्युजीशियंसच्या बँडबरोबरच इतिहास, आटर्स आणि कुकरीचे लेक्चर्स देखील होतील. या क्रुझवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जगभरातील सर्व प्रसिध्द जेवण खायला मिळणार आहे. शिपवर आठ वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टोरंट देखील आहेत.

प्रवाशांच्या वापरासाठी दोन पुल आहेत. जेथून समुद्र पाहता येईल. या शिपमध्ये पाच प्रकारातील रूम्स उपलब्ध आहेत. सर्वात लहान रूम 270 स्केवर फुट आहे.

प्रवासा दरम्यान क्रुझवर 40 हजारवेळा रूम सर्विस जेवण, 2 लाख 50 हजार पाण्याच्या बॉटल, 10 हजार बब्ली बॉटल, 90 हजार वाइन बॉटल, 60 हजार वेगवेगळ्या प्रकारचे जेवण, 9 लाख अंडी, 5 हजार आइस्क्रीम बार, 1 लाख टॉयलेट पेपर रॉलचा वापर होईल. या क्रुझची लांबी 745 फुट आहे. रूंदी 94 फूट, क्रु मेंबर 480 आहेत. हे क्रुझ 2017 मध्ये बनवण्यात आलेले आहे. यामध्ये 930 प्रवाशी प्रवास करू शकतात.

वायकिंग सन क्रुझने याआधी देखील दोनदा जगाचा प्रवास केला आहे. यंदाचा प्रवास मागील प्रवाशाच्या तुलनेत दुप्पट आहे. ग्रीनवीचनंतर क्रुझ डोवर, लिवरपूल, होलीहेड, बेलफास्ट, उलापापुल, किर्कवाल, एडिनबर्ग, इन्वेंर्गोर्डन आणि लेरविक येथे थांबून ब्रिटनच्या द्वीपच्या बाजूने प्रवास करेल. यात्रेचा पहिला पडाव हा नॉर्वेचे बर्गन बंदर असेल.

Leave a Comment