परिक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी या शिक्षकाची आयडियाची कल्पना


परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, इकडे-तिकडे पाहू नये यासाठी शिक्षक अनेक प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न मॅक्सिको येथील एका शिक्षकाने केला आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी परिक्षेत कॉपी करू नये आणि इकडेतिकडे बघू नये यासाठी त्यांना कार्डबोर्ड बॉक्स घालायला लावले. कार्डबोर्ड बॉक्स घालूनच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला. कार्डबोर्ड बॉक्स घातलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर शिक्षकावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. हे मानवधिकारांच्या विरोधात असल्याचे देखील आरोप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी शिक्षकांना निलंबित करण्याची देखील मागणी केली आहे. तर काहीजण सोशल मीडियावर शिक्षकाची तारीफ करत आहेत.

मॅक्सिकोच्या टेलेक्ससला येथील बॅचलर्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनची परिक्षा होती. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांचे पाहू नये, कॉपी करू नये यासाठी सबिनल कॉलेजचे डायरेक्टर लुइस जुआरेज टेक्सिसने सर्व विद्यार्थ्यांना कार्डबोर्ड घालत परिक्षेला बसण्यास सांगितले.

शिक्षकाच्या या कृत्यामुळे एका पालकाने फेसबुक पोस्ट लिहित विद्यार्थ्यांबरोबर झालेला हा व्यवहार अमानवीय असून, शिक्षकांना निलंबित करावे असे म्हटले आहे.

तर शिक्षकाचे कौतूक करणाऱ्या एका युजरने म्हटले आहे की, शिक्षकांचे हे कृत्य विद्यार्थ्यांचे नुकसान करत नाही, हे पालकांना देखील माहित आहे.

डायरेक्टर टेक्सिस यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना केवळ दोन होल असलेला कार्डबोर्ड बॉक्स देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी केवळ पेपरमध्येच बघू शकतील. कार्डबोर्ड बॉक्स घालून विद्यार्थी आजूबाजूला मान देखील वळवू शकत नाही.

टेक्सिस या घटनेवर म्हणाले की, परिक्षेत ते केवळ पर्यवेक्षक होते. केवळ कॉपी रोखण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. याआधीही 2013 मध्ये थायलंडमध्ये कॉपी रोखण्यासाठी पेपरपासून बनवलेले हेल्मेट घालण्यात आले होते.

Leave a Comment