मागील आठवड्याच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा बहुप्रतिक्षीत साहो चित्रपट झळकला. या चित्रपटाची प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पाहात होते. त्यातच या चित्रपटाला आता प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
बाहुबली २चा विक्रम मोडण्यात साहो अयशस्वी
पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने २४ कोटींचा गल्ला जमावला होता. तर ३ दिवसात म्हणजेच विकेंडपर्यंत चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ७९.०८ कोटींचा गल्ला गाठला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत दिली आहे.
हिंदीसह तेलुगू आणि तामिळ या दाक्षिणात्य भाषांमध्येही साहो चित्रपट रिलीज झाला आहे. पण प्रभासच्याच बाहुबली २ चित्रपटाचा विक्रम तोडण्यात साहो अपयशी ठरला आहे. फर्स्ट विकेंडमध्ये बाहुबली २ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने १२८ कोटींचा गल्ला जमावला होता. आता प्रभासचा साहो आणखी किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.