रेल्वे स्थानकावर आता ‘पॉड’ हॉटेलमध्ये करता येणार मुक्काम


रेल्वे प्रशासन प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर राहण्यासाठी आता पॉड हॉटेल अथवा कॅप्सूल हॉटेल तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून या प्रोजेक्टची सुरूवात होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दिल्ली, बैग्लोर, चेन्नई, कोलकत्ता या सारख्या ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्टेशनवर देखील हे हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत.

हे पॉड हॉटेल अत्याधुनिक सुविधा असलेले असेल. यामध्ये छोट्या जागेवर अनेक बेड ठेवलेले असतात. या हॉटेल्सना कॅप्सूल देखील म्हटले जाते. पॉड हॉटेलमुळे रात्रीच्या वेळेस एका ट्रेननंतर दुसरी ट्रेन पकडावी लागते व यामधल्या वेळेत रेल्वे स्टेशनवर थांबावे लागते, अशा प्रवाशांना याचा फायदा होईल.

पहिल्या टप्प्यात 50 करोड रूपये महसूल असणाऱ्या स्टेशनवर ही योजना बनवण्यात येणार आहे. या हॉटेलचे भाडे एका प्रवाशामागे 24 तासांचे 700 रूपये असणार आहे. प्रवाशी काही तासांसाठी देखील हॉटेलचा वापर करू शकतात. मात्र भाडे तेवढेच आकारले जाईल. एका रूममध्ये 20-20 पॉड असतील. महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळे रूम असतील.

या हॉटेलमध्ये हेड फोन, टिव्ही, रिडींग लाइट, मोबाइल पासपोर्ट आणि पर्ससाठी एक छोटे लॉकर, चार्जर प्वाइंट, तसेच एका किटमध्ये पाणी, टॉवेल, साबण इत्यादी गोष्टी मिळतील. रूममध्ये कॉमन बाथरूम आणि टॉयलेट असेल.

Leave a Comment