रहस्य; आपोआप सरकतात या ठिकाणचे दगड


आज विज्ञानामुळे जगत कितीही प्रगत झाले असले, तरी देखील जगभरात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्या कोणालाच सोडवता आलेल्या नाहीत. एक असेच रहस्य पुर्व कॅलिफोर्नियाच्या वाळवंटामध्ये आहे. या जागेला डेथ वॅली (मृत्यूची दरी) असेही म्हणतात.

कॅलिफोर्नियाच्या या डेथ वॅलीची संरचना आणि तापमान वैज्ञानिकांना नेहमीच आश्चर्यचकित करते. मात्र याहीपेक्षा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे आपोआप सरकणारे दगड म्हणजेच सेलिंग स्टोन्स दिसतात. येथे असलेले 300 किलोची दगड देखील आपोआप एकाजागेवरून दुसऱ्या ठिकाणी सरकतात.

दगड सरकणे हे वैज्ञानिकांसाठी देखील आश्चर्यच आहे. येथील रेस ट्रॅक 4 किलोमीटर उत्तर ते दक्षिण आणि 2.5 किलोमीटर पुर्व ते पश्चिम पुर्णपणे सपाट आहे. येथे 150 पेक्षा अधिक दगड असे आहेत. मात्र अद्याप कोणीच स्वतःच्या डोळ्यांनी दगड हलताना बघितलेले नाही.

हिवाळ्यामध्ये हे दगड 250 मीटर दुरपर्यंत सरकलेले दिसतात. 1972 मध्ये हे रहस्य शोधण्यासाठी वैज्ञानिकांची टीम बनवण्यात आली होती. या टीमने एका दगडाचे नामकरण करत, त्याचा 7 वर्ष अभ्यास केला. केरिन नाव असलेला 317 किलोचा दगड वैज्ञानिक अभ्यास करत असताना थोडाही सरकला नाही. मात्र वैज्ञानिक काही वर्षांनी परतले तेव्हा तो दगड एक किलोमीटर लांब गेलेला दिसला.

काही वैज्ञानिकांनुसार, वारे वेगाने वाहते त्यामुळे हे दगड एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी सरकतात. वाळवंटात येणारा 140 किलोमीटर प्रती तास वेगाने येणारा वारा, रात्रीची थंडी यामुळे दगड गतीमान होत असण्याची शक्यता आहे.

स्पेनच्या कम्प्लूंटेस युनिवर्सिटीतील भू-वैज्ञानिकांच्या एका टीमने याबद्दल संशोधन केले होते.  त्यांनी याचे कारण डेथ वॅलीच्या मातीत असणारे मायक्रोब्स असल्याचे सांगितले. हे मायक्रोब्स सायनोबॅक्टेरिया आणि एककोशिकीय शेवाळ आहेत. ज्यामुळे तेथे चिकट पदार्थ आणि गॅस निर्माण होतो. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने हे दगड सरकतात. अनेक वैज्ञानिकांनी या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप याचे उत्तर कोणालाच स्पष्टपणे मिळालेले नाही.

Leave a Comment