अजबच….15 हजाराच्या स्कूटीला 23 हजारांचे चलान


नवीन वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. याचाच फटका दिल्लीतील एका व्यक्तीला बसला. गुरूग्राम येथे एका व्यक्तीला तब्बल 23 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांनी त्या व्यक्तीची स्कूटी देखील जप्त केली. या दंडाच्या पावतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार,  दिल्लीच्या गीता कॉलोनीमध्ये राहणाऱ्या दिनेश मदानला सोमवारी गुरूग्राम येथे काहीतरी काम होते. जिल्हा कोर्ट कॉम्प्लेक्सच्या समोरील सर्विस रोडवर त्याने हेल्मेट काढले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी 23 हजार रूपयांची दंडाची पावती फाडली. दिनेशने सांगितले की, त्यांची स्कूटी जूनी आहे, त्यामुळे त्या स्कूटीची किंमत आता जवळपास 15 हजार रूपये आहे.

दिनेश जवळ स्कूटीचे आरसी, ड्रायव्हिंग लायस्नस, प्रदुषण सर्टिफिकेट हे काहीही नव्हते. पाच नियम तोडल्याने पोलिसांनी हा दंड आकारला.

दिनेशने सांगितले की, ट्रॅफिक पोलिसांनी दंड लावल्यानंतर स्कूटीला जप्त केले आहे. आता गाडी कोर्टातून सोडवावी लागणार आहे. यासाठी आधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी लागेल व त्यानंतर कोर्टात सादर केले जाईल. तसेच दंड भरण्याबरोबरच जामीन देखील द्यावा लागेल. दिनेशने सांगितले की, हे झाल्यानंतर तो खूप काळजीत आहे. मात्र आता तो ही स्कूटी कोर्टातून सोडवणार नाही.

एक सप्टेंबरपासून अनेक राज्यांमध्ये दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली आहे.

Leave a Comment