भारतावर टीका करण्याच्या नादात पाकच्या माजी उच्चायुक्तांनी करून घेतले स्वत:चे हसू


नवी दिल्ली – जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान सर्व स्तरांमधून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटत असल्याचे दिसत आहे. असाच काहीस प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावेळेस चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो काश्मीरमधील तरुण म्हणून रिट्विट केला आहे. पाकिस्तानी नेत्याने आणि अधिकाऱ्याने भारतावर टीका करण्याच्या नादात स्वत:चे हसू करून घेण्याची ही मागील काही दिवसांमधील दुसरी घटना आहे.


काश्मीरसंदर्भातील जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारे एक खोटे ट्विट व्हायरल होत होते. युसूफ नावाच्या तरुणाचा अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे डोळा फुटला आहे. या विरोधात सर्वांनी आवाज उठवायला हवा, अशा कॅप्शनसहीत जॉनी सीनच्या या व्यक्तीचे ट्विट बासित यांनी रिट्विट केले आहे. बासित यांनी आपली चूक लक्षात आल्यानंतर हे ट्विट डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स अनेकांनी आता व्हायरल केले आहे.

Leave a Comment